November 1, 2025 7:33 PM November 1, 2025 7:33 PM

views 25

पालघरमध्ये पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचं आयोजन

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात पोलीस दलातले अधिकारी,  अंमलदार तसंच सुमारे ८,००० नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना एकतेची शपथही देण्यात आली.    अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथंही रन फॉर युनिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये पोलीस, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी तसंच नागरिक सा...

October 29, 2024 12:38 PM October 29, 2024 12:38 PM

views 13

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी ही एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले.  केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.