August 31, 2024 8:17 PM August 31, 2024 8:17 PM
11
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला आज आणखी एक पदक मिळालं. महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं आणि नेमबाजीतलं चौथं पदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं या खेळात किमान एक पदक निश्चित झालं आहे. तिरंदाजी महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सरिता देवी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. मात्र, भारताच्या स्वरूप उन्हाळकर याला पुरुषांच्या १० मि...