October 2, 2025 1:26 PM October 2, 2025 1:26 PM

views 71

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट समोर ठेवून संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १०० वर्षापूर्वी संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हटलं आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त विविध वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. गेल्या १०० वर्षात संघानं लाखो स्वयंसेवकांना घडवलं आणि संघांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ते कार्यरत होते, असं प्रधानमंत्र्यांनी या लेखात नमूद केलं आहे. 

October 1, 2025 1:50 PM October 1, 2025 1:50 PM

views 86

RSSच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे हजारो वर्ष चालत आलेल्या  परंपरेचं पुनरुज्जीवन होतं असं ते म्हणाले. संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांबद्द्ल त्यांनी आदर व्यक्त केला.   १९६३ मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल...