October 2, 2025 1:14 PM October 2, 2025 1:14 PM

views 19

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा

जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं. नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. २०४७ पर्यंतच्या विकसित भारतात संघांचं महत्त्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.    यावेळी त्यांनी देश तसंच संघाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचं स्मरण केलं...

October 1, 2025 9:16 AM October 1, 2025 9:16 AM

views 37

प्रधानमंत्री मोदी RSSच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकात्मतेत संघाची भूमिका या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान या प्रसंगी संघाचं देशाप्रती योगदान अधोरेखित करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही करणार आहेत.

March 23, 2025 7:56 PM March 23, 2025 7:56 PM

views 35

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षं पूर्ण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह  दत्तात्रय होसबाळे यांनी दिली आहे. बंगळुरू इथे आज झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींच्या तीन दिवसीय राष्ट्रीय सभेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या निमित्ताने औपचारिक उत्सव आयोजित केलेला नाही, यंदा विजयादशमीपासून विविध कार्यक्रम सुरू होतील, असंही ते म्हणाले. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकता वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केले ...

November 18, 2024 1:00 PM November 18, 2024 1:00 PM

views 8

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. महिला आणि मुलांचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे माणुसकीला काळिमा फासणारं भ्याड कृत्य असल्याचं मणिपूर आरएसएसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या दोन दिवसात मणिपूरमधे विशेष...

July 22, 2024 1:07 PM July 22, 2024 1:07 PM

सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील बंदी केंद्र सरकारने उठवली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर १९६६ मध्ये ही बंदी लागू केली होती. ती मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं घेतला आहे.