January 19, 2025 8:25 PM

views 22

रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांना पकडल्याची रेल्वे मंत्रालयाची माहिती

रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांना पकडलं आहे. आसाममधून भारतात बेकायदा पद्धतीनं येणारे बहुतांश लोक रेल्वेने देशाच्या इतर भागात जातात. हे थांबवण्यासाठी सीमासुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर पथकांच्या मदतीनं रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.

July 17, 2024 8:13 PM

views 18

‘नंन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत गेल्या ७ वर्षात ८४ हजारांहून अधिक मुलांची सुटका

रेल्वे संरक्षण दलानं नंन्हे फरिश्ते या मोहिमे अंतर्गत गेल्या ७ वर्षात ८४ हजारांहून अधिक मुलांची सुटका केल्याची माहिती रेल्वे मंत्रालायानं दिली आहे. पळून गेलेली, बेपता, अपहरण केलेली आणि मतिमंद मुलांची सुटका या मोहिमे अंतर्गत झाली आहे. नंन्हे फरिश्ते ही केवळ एक मोहीम नसून कठीण परिस्थितीत अडकलेल्या हजारो मुलांची जीवनरेखा आहे, असं मंत्रालायानं म्हटलं आहे.