October 24, 2025 8:20 PM October 24, 2025 8:20 PM
46
रोजगार मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप
देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरात होत आहे. या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये पद मिळालेल्या ५१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख नियुक्त्या करण्यात आल्...