May 4, 2025 2:27 PM May 4, 2025 2:27 PM

views 8

रोमानियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

रोमानियामध्ये आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेअकरा वाजता मतदानाला सुरुवात होईल. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत फसवणूक आणि घोटाळा झाल्याचा निर्णय देत रोमानियाच्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणुक अवैध ठरवली होती. आजच्या निवडणुकीत AUR पक्षाचे जॉर्ज सिमियन, बुखारेस्टचे महापौर निकुसर डॅन, क्रिन अँटोनेस्कू आणि अपक्ष एलेना लास्कोनी यांच्यासह सात इतर उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जर कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली नाही...

September 18, 2024 12:43 PM September 18, 2024 12:43 PM

views 11

भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण कालं नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनिएला मरियाना सेजोनोव उपस्थित होत्या.  हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतिक आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. दोन्ही देशातल्या ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधाचा गौरव करण्यासाठी हे टपाल तिकीट योग माध्यम असल्याचंही ते म्हणाले.