August 4, 2025 1:26 PM August 4, 2025 1:26 PM
4
LokSabha : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ११ लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं निवेदन
रोजगार मेळ्यात मागच्या १६ महिन्यांच्या कालावधीत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराच्या केवळ ३ कोटी संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत येत्या ५ वर्षात ४ ...