May 8, 2025 9:33 AM May 8, 2025 9:33 AM

views 4

कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्तीची घोषणा

आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन गडी राखून पराभव केला. कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईने 2 चेंडू राखत हे उद्दिष्ट साध्य केलं.   तर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. समाज माध्यमांवर त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे.   रोहितने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40 पूर्णांक 57 च्या सरासरीने 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4301 धावा केल्या आहेत.

April 16, 2025 4:00 PM April 16, 2025 4:00 PM

views 7

वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला रोहित शर्मा ह्याचं नाव

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.  आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली.      वानखेडे स्टेडीयम मधे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आधीपासूनच आहेत. 

November 18, 2024 1:36 PM November 18, 2024 1:36 PM

views 5

क्रिकेट : कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा येत्या २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेचा पहिला सामना खेळू शकणार नाही. ही कसोटी सामन्यांची स्पर्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. रोहित व्यतिरिक्त शुभमन गिल हा देखील अंगठ्याच्या दुखापतीमुळेही पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. रोहित आणि शुभमन ऐवजी या सामन्यात के एल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन खेळणार आहेत.