November 2, 2024 2:54 PM

views 23

फॅशनविश्वातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोहित बल याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

  फॅशनविश्वातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोहित बल याचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. रोहित बल दीर्घकाळापासून हृदयविकारानं ग्रस्त होते. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात दाखल होते. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक ऑफ इंडियामध्ये व्यवसायिक फॅशन डिझायनर असलेल्या रोहित बल यांनी कायनात अ ब्लूम इन द युनिव्हर्स नावानं वस्त्राचं प्रदर्शन केलं ते शेवटचं प्रदर्शन ठरलं.