September 15, 2024 7:48 PM September 15, 2024 7:48 PM

views 14

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा झारखंडला मोठा धोका – प्रधानमंत्री

संथाल परगणा आणि कोल्हान भागातली लोकसंख्येची स्थिती झपाट्याने बदलत आहे, इथल्या आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे तर घुसखोर वाढत आहेत, या भागाला रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा धोका आहे अशी चिंता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज जमशेदपूर इथं आयोजित परिवर्तन महामेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही ...