December 11, 2025 8:11 PM December 11, 2025 8:11 PM

views 5

अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १४ मजूर ठार, ७ बेपत्ता

अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डंपर हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ जण ठार आणि ७ जण बेपत्ता झाले आहेत, तर १ जण बचावला आहे. हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली.    त्यामुळे या दुर्घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याचं तिनसुकियाच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आतपर्यंत १४ मृतदेह सापडले असून इतर ७ जणांचा शोध सुरु आहे.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या द...

December 1, 2025 1:32 PM December 1, 2025 1:32 PM

views 35

सोलापुरात रस्ते अपघातात ५ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी तुळजापूरला घेऊन जाणारी कार आणि भरधाव ट्रक यांची धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती, की कार पुलावरून खाली जाऊन तीन ते चारवेळा पलटी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं.

November 3, 2025 8:32 PM November 3, 2025 8:32 PM

views 23

रस्ते अपघातात तेलंगणामध्ये १९, तर राजस्थानमधे १४ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना आरटीसी बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.   अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विशेष वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.    राष्ट्रपती, उपराष्ट्रप...

November 3, 2025 1:41 PM November 3, 2025 1:41 PM

views 22

तेलंगणात रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू, २० जखमी

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकनं आरटीसी बसला धडक दिल्यामुळे ही घटना घडली. विकाराबादच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलं. तसंच २० जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.   अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज...

March 11, 2025 3:44 PM March 11, 2025 3:44 PM

views 13

महाराष्ट्रात ३ वर्षांत १ लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.   वाहनचालकाने मद्यपान केलं आहे का, याची चाचणी करणाऱ्या यंत्रांसोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे का, हेदेखील तपासणारी यंत्रं मागवण्याची प्रक्रिया राज्...

March 3, 2025 8:51 AM March 3, 2025 8:51 AM

views 12

महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं समाधान

राज्यातल्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित 'परिवहन भवन' इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, यांच्...

February 16, 2025 2:41 PM February 16, 2025 2:41 PM

views 24

उत्तरप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वेवर आज पहाटे रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ६ पेक्षा जास्त जखमी झाले. महाराष्ट्रातून अयोध्येकडे चाललेली टेंपो ट्रॅव्हलर गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर आदळून हा अपघात झाल्याचं समजतं. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण उपचारादरम्यान मरण पावले. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं. 

January 26, 2025 8:03 PM January 26, 2025 8:03 PM

views 6

तेलंगणामध्ये रस्ता अपघातात ५ जण ठार, ६ जखमी

तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्यात मामुनरु महामार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात ५ जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.    लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा एक ट्रक मधल्या सळ्या बांधलेली दोरी अचानक तुटल्यानं चालकाचं ट्र्कवरच नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दोन रिक्षांवर आदळला. या अपघातात रिक्षातील प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे ...

January 22, 2025 8:11 PM January 22, 2025 8:11 PM

views 20

कर्नाटकातल्या अरबाईल घाटात झालेल्या रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू

कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी ५जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. आणखी १५ जणांवर उपचार सुरु आहेत.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प...

December 30, 2024 8:15 PM December 30, 2024 8:15 PM

views 14

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं ७१ जणांचा मृत्यू

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं किमान ७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६८ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबापासून सुमारे ३०० किलोमीटरवर असलेल्या सिदामा मध्ये काल हा अपघात झाला.