August 20, 2024 6:14 PM

views 24

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागं घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणाचा निकाल तातडीनं लागावा या मागणीसाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता.  सरकारकडे केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागं घेत असल्याचं निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सांगितलं. अन्य ठिकाणीच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरही लवकरच संप मागं घेतील अशी अपेक्षा आहे.