September 29, 2025 1:29 PM September 29, 2025 1:29 PM
16
सेनेगलमध्ये रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे ७ जणांचा मृत्यू
रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे सेनेगलमधे सात जणांचा मृत्यू झाल्याचं सेनेगलचे आरोग्य मंत्री इब्राहीम साय यांनी सांगितलं आहे. आरव्हीएफ विषाणूमुळे जनावरांकडून माणसाला होणारा हा आजार आहे, असं आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षाचे प्रमुख बोली डिओप यांनी सांगितलं. त्यामुळे पशुधन विभागाशी समन्वय साधून या रोगाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोग्य मंत्री साय म्हणाले. अलिकडच्या काळात हा आजार पश्चिम आफ्रिकेत वारंवार डोके वर काढत असून सेनेगर, नायगर, मौरितानिया या देशांमध...