April 5, 2025 2:26 PM April 5, 2025 2:26 PM

views 12

आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात काल भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने सुवर्णपदक पटकावलं तर पुरुष गटात आशियाई स्पर्धा विजेत्या चैन सिंग ने कांस्य पदक पटकावून भारताचं खात उघडलं आहे. भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंग चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.  

October 3, 2024 3:30 PM October 3, 2024 3:30 PM

views 16

जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं पटकावलं रायफल ३ प्रकारात कांस्य पदक

पेरू मधे लीमा इथं आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेतर्फे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं महिलांच्या ५० मीटर रायफल ३ प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या बरोबरच भारताची पदकसंख्या १५ झाली आहे. यात १० सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सांघिक प्रकारात १ हजार ७५७ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.