March 13, 2025 2:47 PM March 13, 2025 2:47 PM
13
RG Kar Medical College : सर्वोच्च न्यायालयाची पुढच्या आठवड्यात सुनावणी
कोलकातामधल्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने चालवलेल्या खटल्याची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. या गुन्ह्यासंदर्भात निदर्शने करणारे शिकाऊ डॉक्टर आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश आधीच्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गेल्या ऑक्टोबरमध्ये कोलकाता पोलिसांसह काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय रॉय यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं हो...