March 17, 2025 10:17 AM March 17, 2025 10:17 AM
4
RG Kar Rape Case : अत्याचार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
कोलकातामधील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आजपासून पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. मागील सुनावणीत, सरन्यायाधीश खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने, या प्रकरणाविरुद्ध देशभरात झालेल्या निदर्शनात सहभागी झालेल्या डॉक्टर्स आणि वैद...