November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM
20
आधार कार्डाच्या आधारे दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश
केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा, तसंच याप्रकरणी पोलिस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं जारी केलं. अमरावती, सिल्लोड, अकोला, छत्रपती संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणी या मोहिमेवर अधिक भर दिला जाणार आहे. १६ मुद्द्यांच्या आधारे या दाखल्यांची तपासणी केली ज...