August 18, 2024 11:01 AM August 18, 2024 11:01 AM
13
मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून साडेचार किलो सोने जप्त
मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं, मुंबईला उतरलेल्या दोन व्यक्तींकडून तस्करी करण्यात येत असलेलं साडेचार किलो सोने जप्त केलं. अबुधाबी ते मुंबई असा प्रवास केलेल्या या दोन व्यक्तींची महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यापैकी, एकाच्या अंगावर घातलेल्या जाकिटाच्या आत चार पाकिटं दडवलेली आढळली. अबुधाबी विमानतळावर ही पाकिटे या व्यक्तीकडे देण्यात आल्याचं चौकशीदरम्यान सांगितल्याचं बातमीत म्हटलं आहे.