November 12, 2025 3:27 PM November 12, 2025 3:27 PM

views 28

फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या तयारीत

पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २०२६मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपली कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथे एका परिषदेत सांगितलं. येत्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून उद्या आयर्लंडविरुद्ध पोर्तुगाल हा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास पोर्तुगालचा फिफा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.   जगभरात असंख्य चाहते अ...

June 23, 2025 2:47 PM June 23, 2025 2:47 PM

views 12

हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा

भारतासाठी हॉकीमध्ये दोनवेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  भारतानं बेल्जियमविरुद्धच्या FIH प्रो लीग सामन्यात ४-३ असा विजय मिळवत आपला हंगाम संपवला, त्यानंतर लगेचच ललितने समाजमाध्यमावर सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.   ललित उपाध्यायनं भारतासाठी १८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ६७ गोल केले आहेत. २०१४ च्या हॉकी विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या ललितनं टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकलं आहे. भारतीय ह...

May 12, 2025 1:18 PM May 12, 2025 1:18 PM

views 13

क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटने आत्तापर्यंत १२३ सामन्यांमध्ये ४६ पूर्णांक ८५ शतांशच्या सरासरीने ९ हजार २३० धावा केल्या आहेत.   त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतकं करणारा विराट कोहली दुसरा क्रि...