October 13, 2025 8:03 PM October 13, 2025 8:03 PM

views 32

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर १.५४ टक्के

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर सप्टेंबर २०२५ मधे १ पूर्णांक ५४ शतांशांवर पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम विभागाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या ८ वर्षातला हा नीचांक आहे.  ग्रामीण भागात महागाई  एक पूर्णांक सात शतांश टक्क्यांनी कमी झाली तर शहरी भागात २ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांनी कमी झाली. विशेषतः अन्नपदार्थांचे भाव या महिन्यात कमी झाले.

May 13, 2025 7:35 PM May 13, 2025 7:35 PM

views 12

एप्रिलमधे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ३.१६%

एप्रिल २०२५ मधे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक १६ शतांश टक्क्यांवर उतरला. मार्च २०२५मधे तो ३ पूर्णांक ३४ शतांश टक्के होता. भाज्या, कडधान्य, फळं, मांस, मासे , तसंच वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे दर कमी झाल्यानं भाववाढीला आळा बसला.  अन्नधान्य किंमत  निर्देशांकात घट होऊन तो २ पूर्णांक ६२ टक्क्यांवरुन १ पूर्णांक ७८ शतांश टक्क्यांवर आला. शहरी भागात ही घट २ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवरुन १ पूर्णाक ६४ शतांश टक्के अशी झाली. ग्रामीण भागात २ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यांवरुन १ पूर...

September 13, 2024 2:32 PM September 13, 2024 2:32 PM

views 14

किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ

देशाच्या किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा दर ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश  टक्के झाला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली.  गेल्या पाच वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात कमी दर आहे. हा दर रिझर्व बँकेच्या २ ते ६ या नियंत्रण कक्षेत आहे.

August 12, 2024 7:52 PM August 12, 2024 7:52 PM

views 17

गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली

या वर्षीच्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली आला. गेल्या ५९ महिन्यांतला हा सर्वात कमी दर आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, भाजीपाला, फळं आणि मसाल्यांचे दर घसरल्यामुळं गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात घसरण झाली.