June 2, 2025 7:33 PM June 2, 2025 7:33 PM

views 15

आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला. result25.jeeadv.ac.in. या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते.

February 5, 2025 10:44 AM February 5, 2025 10:44 AM

views 20

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.

August 23, 2024 9:31 AM August 23, 2024 9:31 AM

views 10

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.