November 25, 2024 1:46 PM November 25, 2024 1:46 PM
23
भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय
बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या. भारताकडून जसप्रित बुमराह,मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर वॉशिग्टन सुंदर यानं दोन गडी बाद केले. काल विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्या. त्यानंतर भारतानं डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी...