December 18, 2025 8:06 PM

views 36

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं पवार यांनी सांगितलं.   सार्वजनिक जीवनात नेहमीच ...

July 12, 2025 7:49 PM

views 28

जयंत पाटील यांच्या राजीनामाच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसार चालतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.