April 9, 2025 6:59 PM April 9, 2025 6:59 PM
13
RBIचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. गेल्या बैठकीत हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज पतधोरण आढावा समितीनं वर्तवला होता. त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दराचा ६...