February 5, 2025 8:14 PM February 5, 2025 8:14 PM

views 18

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

November 21, 2024 8:05 PM November 21, 2024 8:05 PM

views 13

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक – शक्तिकांत दास

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक आहे.  किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं प्रतिपादन  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ग्लोबल साऊथच्या उच्च स्तरीय बैठकीत केलं. विकास आणि चलनवाढ यांच्यातील समतोल  साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्त्वाचा आहे असंही शक्तिकांत दास  यांनी सांगितलं.