June 6, 2025 7:36 PM June 6, 2025 7:36 PM

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

February 5, 2025 8:14 PM February 5, 2025 8:14 PM

views 16

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

December 21, 2024 9:58 AM December 21, 2024 9:58 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये असंबद्धता आढळून आल्यामुळे दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम फायनान्सची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते तसंच त्यांच्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती असं आरबीआय नं सांगितलं.  

December 14, 2024 6:48 PM December 14, 2024 6:48 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेची तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. येत्या १ जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान होईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कर्ज वितरण सुलभ झाल्यानं किसान क्रेडिट कार्ड कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल असंही या निवेदनात म्हटलं आहे.

December 9, 2024 7:04 PM December 9, 2024 7:04 PM

views 25

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारनं केली आहे. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील. त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. १९९०च्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले संजय मल्होत्रा सध्या अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर काम करत आहेत.

December 7, 2024 11:06 AM December 7, 2024 11:06 AM

views 3

रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेनं काल आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यात रेपो रेट साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सलग अकराव्यांदा प्रमुख व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व बँकेनं घेतला आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर सव्वा सहा टक्के तर किरकोळ स्थायी सुविधा दर आणि बँक दर पावणे सात टक्के कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

November 17, 2024 2:30 PM November 17, 2024 2:30 PM

views 8

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी मिळाल्यानं काल पोलिसांनी सतर्क होत गुन्हा नोंदवला आहे. लष्कर ए तैयबाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा करत एका अज्ञाताने वांद्रे इथल्या रिझर्व बँकेच्या ग्राहक सेवा कक्षात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केला होता. पोलिसांनी संबंधित परिसराची कसून तपासणी केली असता, ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं. गेले काही दिवस मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह, शहरातल्या महत्त्वाच्या इमारतींमधे बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या वारंवार मिळत आहेत. पोलीस याचा तपास करत आहेत.

October 9, 2024 2:09 PM October 9, 2024 2:09 PM

views 8

विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी, या उद्देशाने रिझर्व बँकेकडून शिष्यवृती योजना जाहीर

अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांशी संबधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशाने रिझर्व बँकेने एक शिष्यवृती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक यासाठी पात्र असतील. अर्थशास्त्र, बँकींग, क्षेत्रीय उलाढाली किंवा बँकेशी संबधित क्षेत्रात कमी कालावधीचा संशोधनासाठी त्यांना अर्ज करता येतील. सादर झालेले संशोधन प्रस्ताव, शैक्षणिक कार्य आणि मुलाखत यावर आधा...

September 7, 2024 9:30 AM September 7, 2024 9:30 AM

views 6

भारतीय गंगाजळीची ६८४अब्ज डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर झेप

भारताच्या परकीय चलन साठ्यात ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात २ अब्ज डॉलर्सहून अधिक वाढ होऊन त्यानं जवळपास ६८४ अब्ज डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर झेप घेतली. भारतीय रिझर्व बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डॉलरच्या निरंतर आणि सुदृढ प्रवाहामुळं परकीय चलन साठ्यातील ही सलग तिसरी साप्ताहिक वाढ आहे. गेल्या तीन आठवड्यांत, या गंगाजळीत १४ अब्ज डॉलर्सची भर पडली. सोन्याचा साठा ८६२ दशलक्ष डॉलरनं वाढून अंदाजे ६२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असंही या आकडेवारीत म्हटलं आहे.