February 28, 2025 4:01 PM February 28, 2025 4:01 PM
25
‘धनगर समाजाने ST प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी OBC प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं’
धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. लातूर इथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. वारंवार उपोषणाला बसून जरांगे यांनी लोकशाहीतल्या उपोषणासारख्या अस्त्राचाही खेळखंडोबा केल्याची टीका हाके यांनी केली आहे. कुणबी दाखल्याबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही हाके यांनी केली.