August 8, 2025 1:28 PM

views 18

उत्तराखंडमध्ये बचाव कार्य प्रगतीपथावर

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. वातावरण निवळल्यावर अडकलेल्या लोकांना जलदगतीने बाहेर काढलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. आतापर्यंत ३७२ जणांना सुरक्षित बाहेर काढून आयटीबीपी कँपमधे हलवण्यात आलं आले. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून ९ जवानांसह १६ जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे.    लोकांना बाहेर काढण्यासाठी यासाठी चिनुक आणि एम आय १७ विमानांची मदत घेतली जात आहे. अडकलेल...