January 26, 2025 6:13 PM
55
राज्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवी मुंबईत कळंबोली इथे पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई पोलीस पथकासह विविध पथकांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात अलिबाग इथे पोलीस मैदानावर महिला आणि बालवि...