January 24, 2025 8:02 PM January 24, 2025 8:02 PM

views 8

आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते गेली २० वर्षं आयआयटी मुंबईत विविध विभागांमध्ये काम करत असून ते सध्या मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थितीत राहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

January 24, 2025 9:15 AM January 24, 2025 9:15 AM

views 6

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंडोनेशियाच्या अध्यक्षांचं नवी दिल्लीत आगमन

या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं. सुबियांतो यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य पाहुणे आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.   आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात सुबियांतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष समारंभातही ते उपस्थित राहणार आहेत. सुबियांतो यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सूत्रं हाती घेतल्यानंतरचा त्...

January 2, 2025 2:29 PM January 2, 2025 2:29 PM

views 11

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरुन किंवा आमंत्रण ॲप वरुन थेट तिकिटं खरेदी करता येतील.