April 9, 2025 6:59 PM

views 27

RBIचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. गेल्या बैठकीत हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज पतधोरण आढावा समितीनं वर्तवला होता. त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दराचा ६...

February 7, 2025 8:23 PM

views 25

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात, आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळं रेपो दर साडे ६ टक्क्यावरुन सव्वा ६ टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांचा अंदाजही खाली आणला. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक...