August 16, 2024 1:45 PM August 16, 2024 1:45 PM

views 10

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या  पुण्यतिथी निमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीतल्या 'सदैव अटल' या त्यांच्या समाधी स्थळाजवळ आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं.   राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स समाजमाध्यमावर वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे.