August 7, 2025 3:38 PM August 7, 2025 3:38 PM
5
उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु
उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. गंगोत्री आणि हर्षिल परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत. त्यातल्या २७४ जणाची सुटका अतापर्यंत करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले १२३ पर्यटक आहेत. आतापर्यंत हर्षिलमधून १३५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातल्या १०० जणांना उत्तरकाशी इथं तर ३५ जणांना डेहराडूनला नेलं आहे. उत्तराखंड राज्य सरकार, इंडोतिबेटन पो...