February 21, 2025 9:30 AM February 21, 2025 9:30 AM
26
दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार
दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली असून ती लवकरच लागू करण्यात येईल, असं ही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या पहिल्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगचे १४ अहवाल मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्व...