October 13, 2024 10:49 AM October 13, 2024 10:49 AM
4
प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू.
प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर कालपासून नोंदणी सुरू झाली आहे. या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा प्रायोगिक तत्वावरील उपक्रम असून यासाठी एकंदर 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. 21 ते 24 वर्षे वयोगटातील एक कोटी उमेदवारांना पाच वर्षांसाठी 12 महिन्यांच...