July 19, 2025 8:43 PM July 19, 2025 8:43 PM

views 19

केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट

केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे.  वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

June 24, 2025 5:36 PM June 24, 2025 5:36 PM

views 38

नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नंदूरबार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.

June 18, 2025 9:48 AM June 18, 2025 9:48 AM

views 11

आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर गृहमंत्रालयाने आज आणि उद्या आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा दिला आहे. राज्य सरकारने सर्व सुरक्षा काळजी घ्यावी असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. राज्यात पावसाचा इशारा असला तरीही उकाडा आणि दमट वातावरण कायम राहाणार असून तापमान 38 अंश सेल्सिअस राहाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान बिस्वनाथ आणि लखीमपूर जिल्ह्यातील 10 गावांना पुराचा वेढा कायम आहे.

May 22, 2025 3:29 PM May 22, 2025 3:29 PM

views 16

दक्षिण कोकणाला पावसाचा रेड अलर्ट

दक्षिण कोकण किनारपट्टी जवळ अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, हवामान विभागानं दक्षिण कोकण किनारपट्टी भागाला जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २ ते ३ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, २७ मे च्या सुमाराला तो  पूर्व भारतात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

September 9, 2024 7:04 PM September 9, 2024 7:04 PM

views 20

मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथल्या १०१ नागरिकांना निवारागृहात हलवलं आहे. धुळेपल्ली गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं. पुरामुळे भामरागड-आलापल्ली, आष्टी-मुलचेरा आणि आलापल्ली-सिरोंचा हे तीन प्रमुख मार्ग बंद आहेत.

August 23, 2024 7:18 PM August 23, 2024 7:18 PM

views 26

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्...

July 20, 2024 2:49 PM July 20, 2024 2:49 PM

views 18

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.