November 25, 2024 2:26 PM November 25, 2024 2:26 PM

views 9

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. २००४ ते २०१४ या १० वर्षात रेल्वेमधे ४ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली ...