February 21, 2025 3:34 PM February 21, 2025 3:34 PM
7
WPL :- क्रिकेट स्पर्धेत आज बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत
महिला प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत बंगळुरूनं या आधी झालेले आपले दोन्ही सामने जिंकले आहेत, तर मुंबईनं दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला.