June 4, 2025 10:37 AM June 4, 2025 10:37 AM

views 13

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 184 धावा केल्या. बंगळुरूच्या कृणाल पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलं.

May 30, 2025 1:44 PM May 30, 2025 1:44 PM

views 13

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चंडिगडमध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं पंजाब किंग्जवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पंजाब किंग्ज संघानं दिलेलं १०२ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्सनं केवळ १० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.    आज मुंबई इंडियन्स आणि  गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. यातील विजेता संघ १ जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल. आणि या सामन्यातील विजेता संघ ३ जूनला अह...

March 23, 2025 9:08 AM March 23, 2025 9:08 AM

views 8

IPL 2025 : RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा ७ गडी राखून पराभव

इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने हे लक्ष्य १७ व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं.