August 8, 2024 8:12 PM August 8, 2024 8:12 PM
2
भारतीय रिझर्व बँकेचं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर
भारतीय रिझर्व बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग नवव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याज दर सव्वा सहा टक्के, तसंच मुदत ठेवींवरचा व्याज दर आणि बँकांचा व्याज दर पावणेसात टक्क्यावर कायम राहील, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की आर्थिक विकासाला चालना देताना चलनवाढ निर्धारित उद्दिष्टाशी सुसंगत राहील, यावर लक्ष केंद्रित ...