April 10, 2025 10:46 AM April 10, 2025 10:46 AM
7
RBI : सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. तसंच एसडीएफ दर ५ पूर्णांक ७५ शतांश टक्के आणि एमएसएफ दर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. सोन्याच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होऊन तो ४ पूर्णांक १ दशांश टक्के झाल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, हवामान बदल यामुळे २०२५-२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ४ टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. व...