August 6, 2025 3:49 PM August 6, 2025 3:49 PM
4
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला
भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण, शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळं महागाई दरा...