June 6, 2025 8:22 PM June 6, 2025 8:22 PM

views 76

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के कपात, शेअर बाजारात जोरदार तेजी

रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के पर्यंत आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पत धोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे.   या आधी हा दर ४ टक्के राहील असा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक वृद्धी...