May 17, 2025 3:07 PM May 17, 2025 3:07 PM
13
लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोट चलनात येणार
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. आर बी आय नं आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. महात्मा गांधी मालिकेतल्या या नोटा आधीच्या नोटांसारख्याच आहेत तसंच याआधीच्या नोटाही चलनात लागू राहणार असून त्यांच्या वापरावर कोणताही परिणाम होणार नाही.