December 14, 2025 7:12 PM December 14, 2025 7:12 PM

views 24

रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्य़ा मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करत, राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

December 5, 2025 8:16 PM December 5, 2025 8:16 PM

views 38

RBI कडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.   महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. इतरही दर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज झाला.  &nb...

December 5, 2025 9:44 AM December 5, 2025 9:44 AM

views 14

RBI आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. आरबीआयच्या पतधोरण समितीची, बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू आहे. या पतधोरण आढाव्यात व्याजदरात 25 टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

October 16, 2025 1:28 PM October 16, 2025 1:28 PM

views 58

अमेरिकेनं लादलेलं आयात शुल्क ही भारतासाठी चितेंची बाब नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मत

अमेरिकेनं लादलेलं ५० टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-जागतिक बँकच्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत ते बोलत होते.   स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळं अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम कमी होतो, असं त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचलं आहे. त्यांच्याशीही मल्होत्रा यांनी चर्चा केली.

October 9, 2025 1:16 PM October 9, 2025 1:16 PM

views 62

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं संबोधन…

देशातल्या आर्थिक तत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल साक्षरतेत कमी पडणाऱ्या नागरिकांना तसंच वरिष्ठ नागरिकांनाही सहज वापरता येतील अशा प्रकारची उत्पादनं आणि सेवा सादर कराव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ते काल बोलत होते. डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालुन माहितीचं संरक्षण तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. देशात सध्या १० हजार हुन जास्त फिनटेक कंपन्या अस...

October 7, 2025 7:53 PM October 7, 2025 7:53 PM

views 207

राज्यातल्या सहकारी बँकांवर RBIचे निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक्षणासाठी पात्र आहेत. २०१६ मध्येही या बँकेचा परवाना रद्द झाला होता पण बँकेनं दिलेल्या आव्हानानंतर २०१९ मध्ये तो पुन्हा दिला होता.    सोलापूरची समर्थ सहकारी बँक आणि धाराशिवची समर्थ अर्बन को ऑपरेटिव...

October 1, 2025 3:08 PM October 1, 2025 3:08 PM

views 36

झिरो बॅलन्स बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत

झिरो बॅलन्स असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.    पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसुविधा, बँकिग क्षेत्र मजबूत करणे, कर्ज पुरवठा वाढवणे, व्यवसाय सुलभता, परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण याला चालना देण्यासाठी त्यांनी २२ सुधारणा जाहीर केल्या.

October 1, 2025 1:39 PM October 1, 2025 1:39 PM

views 61

रेपो दर ५.५ टक्के ठेवण्याचा RBIचा निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल  न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असं मल्होत्रा यांनी सांगितलं. स्थिर देशांतर्गत वाढ, महागाईचा कमी झालेला दर आणि वाढती जागतिक जोखीम लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यानी सांगितलं.   उत्पादन आणि पुरवठ्यातली वाढ, वस्तू आणि सेवा कराची पुनर्रचना य...

October 1, 2025 9:13 AM October 1, 2025 9:13 AM

views 34

RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दहा वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व...

September 29, 2025 3:19 PM September 29, 2025 3:19 PM

views 100

RBIच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची ३ दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी १० वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील. सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ञांचं मत आहे. जून महिन्यात बँकेनं रेपो दर अर्धा टक्क्यानं कमी केला होता मात्र ऑगस्ट महिन्यात रेपो दरात काहीही बदल केला नव्हता.