March 10, 2025 8:30 PM March 10, 2025 8:30 PM
34
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या 10-12 वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर काम करत असून पक्ष सोडताना दु:ख होत आहे, असं धंगेकर म्हणाले. नवीन पक्ष प्रवेशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.