December 12, 2025 3:09 PM December 12, 2025 3:09 PM

views 26

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याचा महायुतीचा निर्धार

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.   आगामी निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपली बैठक झाली, यात एकत्र लढण्याविषयी एकमत झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. जागावाटप स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरवलं जाईल, असं ते म्हणाले

July 2, 2025 8:40 AM July 2, 2025 8:40 AM

views 95

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईतल्या वरळी इथं काल झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी चव्हाण यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली.