November 12, 2024 7:44 PM November 12, 2024 7:44 PM
13
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रवी राणा यांना ताकीद
अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महायुतीची शिस्त पाळायला हवी, महायुतीविरुद्ध काम करणं चालणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अमरावतीत भाजपाचे उमेदवार जिंकायला हवेत, बाकीचे पराभूत झाले तरी चालतील, अशा आशयाचं विधान रवी राणा यांनी एका सभेत केलं होतं. त्यासंदर्भात ते बोलत होते. रवी राणा विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यासारखं वागत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. रवी राणा यांच्या भाषेमुळेच त्यांच्या ...