October 9, 2024 3:34 PM October 9, 2024 3:34 PM
11
रत्नागिरीतल्या ५ नव्याने सुशोभित स्थानकांचं लोकार्पण
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकं विमानतळा...